*कणकवली ता.०३-:* कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे शुकवार ११ मार्च ते बुधवार १६ या कालावधीत प्रतिष्ठानचा नाट्यमंदिरात मच्छींद्र कांबळी स्मृती नाट्यउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . सहा दिवस चालणाऱ्या उत्सवात नाट्यरसिकांना विविध विषयांवरील नाटके पाहता येणार आहेत . शुकवार ११ मार्च सायंकाळी ६.३० वा . व रात्री ९ .३० वा . प्रदीप वैद्य लिखीत व दिग्दर्शित काजव्यांचा गाव ‘ हे नाटक सादर होईल . शनिवार १२ मार्च रात्री ९ वा . पियूष मिश्रा लिखीत व शंतनू पाटील दिग्दर्शित काफिला कोल्हापूरनिर्मित गगन ‘ दमामा बाज्या ‘ हे नाटक सादर होईल .
रविवार १३ मार्च रोजी रात्री ९ वा धनंजय सरदेशपांडे लिखीत व रुपाली गोडंबे दिग्दर्शित फारचं टोचलय नाटक सादर होईल,तर रात्री १०.३० वा राजेंद्र चव्हाण लिखीत मित्र शिरगावनिर्मित ‘ मनदेशी माणसे ‘ हे नाटक सादर होईल . सोमवार १४ मार्च रात्री ९ वा मृणालिनी बनारसे लिखीत व विद्यानिधी बनारसे दिग्दर्शित ‘ डार्विन ‘ तर रात्री १०.३० वा . आदिती वेंकटेशन लिखीत व विद्यानिधी वनारसे दिग्दर्शित आयपारनिर्मित ‘ फॉल अगेन फ्लाय बेटर ‘ हे सादर होईल . मंगळवार १५ मार्च रोजी रात्री ९ वा . व रात्री १०.३० वा रामू राममाधन लिखीत अतुल पेठे दिग्दर्शित नाटकघर पुणे निर्मित ‘ शब्दांच्या रोजनिशी ‘ हे नाटक सादर होईल . बुधवार १६ मार्च रोजी रात्री ९ वा . दास्तान – ए – बडी बांका हे नाटक सादर होईल तरी नाट्यरसिकांनी नाट्यउत्सवात सहभागी होऊन नाटके पाहवीत असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
