Headlines

एकाच कार्यालयात गेली अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करा…

भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष वैभव राऊळ यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

आंबोली ता.०३-:* वर्ग २ मधील अधिकाऱ्यांना जिल्ह्यात १० तर तालुक्यात ५ वर्ष राहण्याचा नियम असताना गेली अनेक वर्षे एकाच जागी आणि एकाच कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष वैभव राऊळ यांनी केली आहे.

यावेळी जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांनी यात स्वतः लक्ष घालावे, त्यासाठी पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागाकडून अहवाल घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले. सबंधित अधिकारी ठेकेदार सोबत त्यामुळे आर्थिक हितसंबंध निर्माण करत आहेत. त्यामुळे कामाचा दर्जा देखील खालावत असल्याचा आरोप त्यानी यावेळी केला आहे.

You cannot copy content of this page