किनळे येथील विविध विकास कामांचा शर्वाणी गावकर यांच्या हस्ते शुभारंभ

*सावंतवाडी ता.०३-:* सावंतवाडी तालुक्यातील किनळे येथील विविध विकास कामांचा शुभारंभ महिला व बालकल्याण सभापती शर्वांणी गावकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शेखर गावकर, माजी उपसभापती संदीप नेमळेकर, सरपंच दीपक नाईक, वैभव सोपटे, सदस्य शिशिल डिसोजा, लता मसुरकर, किनळे चर्च फादर आल्बेट फर्नांडिस, पिटर फर्नांडिस, दयानंद नाईक, ज्ञानेश्वर नाईक, सखाराम मसुरकर, बाबुस लॉड्रिक्स, माट्टा फर्नांडिस, पावलू डिसोजा, बावतिस डिसोजा, आदेलेसाव डिसोजा, पिटर फर्नांडिस, डांगो डिसोजा,दत्ताराम नाईक,आनंद नाईक,लुशी फर्नांडिस,अजित जोशी उपस्थित होते. यात कापूसटेंबवाडी रस्ता खडीकरण, डांबरीकरण, ख्रिचनवाडी येथे सार्वजनिक लघु नळ योजना, किनळे मुख्य रस्ता ते सोपटे घरापर्यंत खडीकरण, किनळे चव्हाटा मंदिर ते गोडगेश्वर मंदिर रस्ता खडीकरण आदी विकास कामांचा समावेश आहे.

You cannot copy content of this page