जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी महेश धोत्रे यांची नियुक्ती…

ओरोस ता.०३-:* जिल्हा परिषदेचे नवे प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी महेश सं. धोत्रे यांची नियुक्ती केली आहे लवकरच ते या पदावर रुजू होणार आहेत.राज्याच्या शिक्षण क्रीडा विभागाच्या माध्यमातून शिक्षण अधिकारी आणि तत्सम ५२ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे आदेश शिक्षण विभागाचे उपसचिव ति.वा करपे यांनी काढले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी एकनाथ अबोकर यांची बदली कोल्हापूर येथे बदली झाल्यानंतर या पदाचा कार्यभार नव्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी आलेले शेख यांच्याकडे आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी म्हणून रिक्त पदावर नव्याने शिक्षणाधिकारी मिळावे यासाठी सातत्याने मागणी सुरू होती त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे शिक्षणाधिकारी पदी महेश सं.धोत्रे यांची नियुक्ती झाली आहे.

धोत्रे हे सांगली येथे उपशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत होते शासनाच्या २३ फेब्रुवारी च्या एका काढलेल्या आदेशात कोकण विभागासह अन्य विभागातील शिक्षणाधिकारी आणि तत्सम प्रवर्गाच्या रिक्त जागांवर पदोन्नती देण्याचे आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे शिक्षणाधिकारी म्हणून महेश धोत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धोत्रे हे लवकरच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे

You cannot copy content of this page