७.७ दशलक्ष लिटर सांडपाणी सोडले जाते समुद्रात

सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण व कणकवली स्थानिक संस्थानचा समावेश;प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई न केल्यास न्यायालयात जाणार हिंदू जनजागृती समितीचा इशारा

सिंधुदुर्गनगरी ता २८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला व मालवण नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत कडून प्रति दिन ७.७ दशलक्ष लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता कोणत्या ना कोणत्या वाटे समुद्रात सोडले जात असल्याची धक्कादायक बाब हिंदू जनजागृती समितीने उघड केली आहे. प्रक्रिया न करता सांडपाणी समुद्रात सोडण्यात येत असल्याने समुद्रातील जीव सृष्टीला आणि मनुष्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे संबधित नगरपरिषदा, नगरपंचायत प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केला जात आहे. तरी संबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी होवून त्यांच्यावर फौजदारी करवाई करावी .अशी मागणी केली आहे. तसेच असे न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक संदेश गावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला आहे. हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियान अंतर्गत आज जिल्हा समनव्यक संदेश गावडे यांनी पत्रकार परिषद घेत सांडपाणी प्रकाराची माहिती दिली.

यावेळी हिंदू विधीज्ञ परिषदेचे ॲड. सौ. अस्मिता सोवनी, संजय जोशी, गजानना मुंज आदी उपस्थित होते. यावेळी संदेश गावडे म्हणाले की, जिल्ह्यातील नगरपरिषद परिसरातील सांडपाणी काय केले जाते याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून माहितीच्या अधिकारात माहिती घेतली असता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला व मालवण नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत कडून दरदिवशी ७.७ दशलक्ष लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता कोणत्या ना कोणत्या वाटे समुद्रात सोडले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रक्रिया न करता सांडपाणी समुद्रात सोडण्यात येत असल्याने समुद्रातील जीव सृष्टीला आणि मनुष्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना यावर आपन काय कार्यवाही केली अशी विचारणा केली असता त्यांनी केवळ या नगरपरिषदाना नोटिसा बजावल्या असल्याचे सांगण्यात आले. मात्र ठोस कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सांडपाणी व्यवस्थापनाकडे संबधित नगरपरिषदा, नगरपंचायत प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची चौकशी होवून त्यांच्यावर फौजदारी करवाई करावी. अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे ,तसेच असे न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक संदेश गावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला आहे.

You cannot copy content of this page