ग्रामस्थानी केले अभिनंदन
वैभववाडी ता.२८-:संजय शेळके* एडगांव- वायंबोशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दत्ताराम पाष्टे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर ग्रामस्थांनी श्री पाष्टे यांचे अभिनंदन केले.
यावेळी माजी सरपंच प्रमोद रावराणे, रवळनाथ विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुनील रावराणे, माजी उपसरपंच रवींद्र रावराणे, निवडणूक निर्णय अधिकारी उमेश राठोड, ग्रामपंचायत सदस्य वैष्णवी रावराणे, प्रज्ञा रावराणे, सायली घाडी, चेतना पवार तसेच ग्रामस्थ योगेश पवार, सुनील घाडी, अविनाश गुरव, प्रवीण तांबे व ग्रामस्थ उपस्थित होते. एक वर्षाच्या कालावधीनंतर ठरलेल्या नियमानुसार माजी उपसरपंच रवींद्र रावराणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त होते. पाष्टे यांची निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
