महाशिवरात्री यात्रा उत्सव १३ एसटी गाड्याचे नियोजन

देवगड -विजयदुर्ग आगार सज्ज

देवगड ता.२८-:* दक्षिण कोकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा उत्सवाकरिता देवगड आगाराने भाविक भक्तगणांकरिता देवगड बसस्थानकावरून सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक निलेश लाड यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा विभाग नियंत्रक,विभागीय कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड,जामसंडे,तळेबाजार, शिरगाव या मार्गाबरोबर विजयदुर्ग आगारा मार्फत ही ३ प्रवासी फेऱ्या श्री कुणकेश्वर श्री रामेश्वर यात्रेकरिता सोडण्यात येणार आहेत.

देवगड बसस्थानकावरून स.५ वा. पहिली फेरी सोडण्यात येणार असून संपूर्ण दिवसभरात ८ प्रवासी फेऱ्या देवगड बसस्थानकावरून सुटणार आहेत.तसेच जामसंडे कुणकेश्वर १ गाडी,तळेबाजार कुणकेश्वर ,१गाडी ,या प्रमाणे १० गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.आगार व्यवस्थापक निलेश लाड,वैभव पडोळे स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर ,सहा. वाह. निरीक्षक लवू सरवदे ,कार्यशाळा कर्मचारी,चालक वाहक हे भाविक प्रवाशांना अधिकाधिक सेवा देण्याकरिता प्रयत्नशील आहेत. देवगड आगाराने या पूर्वी देवगड सावंतवाडी देवगड ही प्रवासी फेरी सुरू केली असून,अन्य चालक वाहक कामावर रुजू झालेवर कोल्हापूर,रत्नागिरी अन्य मार्गावर प्रवासी फेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापक निलेश लाड यांनी दिली.

You cannot copy content of this page