निबंध व हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवराच्याहस्ते गौरव
कणकवली ता.२८-:* कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळा व कौटुंबिक स्नेहसंमेलन उlसाहात पार पडले. यावेळी आयोजित होम मिनीस्टर या कार्यक्रमात पूजा सातोसे यांनी पैठणीचा मान पटकावला. या कार्यक्रमात पत्रकार समितीच्यावतीने आयोजित निबंध व पत्रकार समिती आणि पत्रकार आणि मित्रच्यावतीने आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवराच्याहस्ते गौरव करण्यात आला.
निबंध स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात अनुक्रमे प्रदीप्ती कुबल, रिया सावंत व पुष्पा सावंत याना, आठवी ते दहावी गटात अनुक्रमे तनया कदम, सोहम महेंद्रकर, पूजा आचरेकर व उत्तेजनार्थ श्रीराम सुतार व नेहा कांबळे, तर महाविद्यालयीन गटात अनुक्रमे सिद्धी मोरे, तन्वी निरूखेकर, श्रद्धा पाटकर व शाभवी कुलकर्णी तर उत्तेजनार्थ दर्शना माईणकर, पल्लवी सुतार याना प्रंताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार, पोलीस निरीक्षक सचिन हुदळेकर, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, उपाध्यक्ष रमेश जोगळे, खजिनदार संतोष सावंत, तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई, संतोष वायंगणकर, अशोक करंबेळकर, सौ. भाग्यलक्ष्मी साटम, चंद्रशेखर उपरकर, तालुका सचिव संजय राणे, खजिनदार नितीन कदम व इतर मान्यवराच्या हस्ते गौरविण्यात आले. पत्रकार समिती व पत्रकार आणि मित्र याच्यावतीने आयोजित स्पर्धेत पाचवी ते आठवीगटात अनुक्रमे ऋतुजा परब, समर्थ शिरसाट व अनुश्री राणे तर नववी ते बारावी गटात अथर्व म्हसकर, प्रज्ञा मेस्त्री, मितेश पाताडे याचा गौरव करण्यात आला. सर्व विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी सुदर हस्ताक्षरमध्ये कनेडी हायस्कूल व शिवडाव हायस्कूलच्या विद्याथ्या¥च्या वळणदार हस्ताक्षराबद्दल गौरवोद्दगार काढण्यात आले. होम मिनिस्टरमध्ये द्वितीय क्रमांक भाग्यलक्ष्मी लोके यानी तृतीय प्रियांका गुरव यानी पटकावला. यात एकूण 17 माfहलांनी भाग घेतला. सुत्रसंचालन उमेश परब यानी केले तर परीक्षण रंजिता तहसीलदार यानी केले. यातील विजेत्यांना मान्यवराच्याहस्ते गौरविण्यात आले.
