बाराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजन
देवगड (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाने बाराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “माझे मत माझे भविष्य”…एका मताचे सामर्थ्य “या विषयावर राष्ट्रीय मतदार जागरूकता स्पर्धा सुरू केली आहे. सदर स्पर्धा दि.२५ जानेवारी २०२२ ते १५ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. वरील विषयावर पाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
यात प्रश्नमंजुषा स्पर्धा,व्हिडीओ तयार करण्याची स्पर्धा,पोस्टरची डिझाइन करण्याची स्पर्धा,गाण्याची स्पर्धा, घोषवाक्य तयार करण्याची स्पर्धा असून गीत स्पर्धा,व्हिडीओ मेकिंग स्पर्धा,व भित्तिचित्रे स्पर्धा,संस्थात्मक,व्यावसायिक ,हौशी,तीन श्रेणी मध्ये करण्यात आले आहे.प्रत्येक श्रेणीतील ३ विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
संस्थांच्या श्रेणीत ४,व्यावसायिक व हौशी स्पर्धकांच्या श्रेणीमध्ये प्रत्येकी ३स्पर्धकांना विशेष उल्लेखनीय पारितोषिके ,तसेच घोषवाक्य प्रश्नमंजुषा,विजेत्यांना आकर्षक वस्तू, इ प्रमाणपत्रे देण्यात येतील. https://eeisveep.nic.in/contest या संकेत स्थळावर सविस्तर नाहीती उपलब्ध आहे. प्रवेशिका पाठविण्याची मुदत १५ मार्च २०२२असून प्रवेशिका voter-contest@eci.gov. in या वर पाठवाव्यात.असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी २६८ कणकवली विधानसभा मतदार संघ तथा तहसीलदार देवगड यांनी केले आहे.
