पुणे-भोसरी येथे करण्यात आले होते आयोजन
दोडामार्ग / सुमित दळवी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था अर्थात नेफडो च्या वतीने राज्यस्तरीय संमेलनाचे अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी पुणे पिंपरी चिंचवड इथे आयोजित करण्यात आले होते. संमेलनाला राज्यभरातून मोठ्या पर्यावरणप्रेमीनी हजेरी लावली होती ह्या वेळी संस्थेतील पर्यावरण प्रेमी सदस्यांचा सत्कार केला जातो पर्यावरण संवर्धनाची उत्कृष्ट कार्यकरणाऱ्याना अनेक पुरस्कारानी सन्मानित केले जाते त्यानुसार सिंधुदुर्ग दोडामार्ग तालुक्यातील आडाळी गावचे सुपुत्र प्रसिद्ध निसर्ग छायाचित्रकार आणि पर्यावरण अभ्यासक श्री. प्रकाश कदम आणि त्यांची कन्या कुमारी प्रिया कदम यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नेफडो राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. दीपक भवर यांच्या हस्ते प्रकाश कदम यांना पर्यावरणीय उपक्रमात सततच्या उत्कृष्ट मार्गदर्शन आणि योगदानाबद्दल विशेष निसर्ग पुरस्कार अंतर्गत गोल्ड मेडल, सन्मान चिन्ह, आम्रवृक्ष देऊन मान्यवरांच्या उपस्थित भव्य सत्कार करण्यात आला त्याच मंचावर प्रकाश कदम यांची कन्या कुमारी प्रिया कदम हिस पर्यावरणीय उपक्रमासाठी मान्यवर लताश्री (माई) वडनेरे यांच्या हस्ते निसर्ग मित्र हया पुरस्कार अंतर्गत ,गोल्ड मेडल , सन्मान चिन्ह, सन्मानपत्र प्रधान करण्यात आले.ह्या वेळी संमेलनाचे खास आकर्षण म्हणजे प्रकाश कदम यांचे देशभरातील टिपलेली निसर्ग छायाचित्रे तर प्रिया कदम हिने निसर्गातील अनेक रंग आपल्या हाताने कागदावर चित्रित केले होते पर्यावरणीय विज्ञान, आपला निसर्ग अशी दोन प्रदर्शने पितापुत्रीने तिथे लावली होती उपस्थित सर्वानी त्यांचा लाभ घेतला आणि समाधान व्यक्त केले. प्रकाश कदम गेली २५ वर्षे पर्यावरण संबंधी अनेक उपक्रमात क्रीयाशील राहून निरीक्षण करत असतात तसेच मार्गदर्शनही करत असतात आतापर्यंत सुमारे ५ लाख सर्वसामान्य आणि विद्यार्थी यांनी त्यांचा प्रदर्शन आणि माहितीचा लाभ घेतला आहे. प्रकाश कदम हे आपल्या मुलांना ह्या उपक्रमात सहभागी करून घेत असतात.ह्या कार्यक्रमास वनविभागाचे मुख्य वन संरक्षक रंगनाथ नाईकडे (वन संरक्षक आय एफ एस),सौ. उषा (माई )ढोरे महापौर पिंपरी चिंचवड महानगर पालिका , जयराज नायर (सिने अभिनेते ),डॉ. एस एच पाटील (आय एफ एस ) चेअरमन महाराष्ट्र स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड,नेफडोचे राष्ट्रीय सलगार, पदाधिकारी लताश्री ( माई )वडनेरे , राजेंद्र नागवडे, पुष्पकताई केवडकर, हरिविजय देशमुख,सुयोग धस , प्रा. दीपक भवर ,सचिन वाघ आणि इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. प्रकाश कदम आणि प्रिया कदम यांचा नेफडो तर्फे सन्मान करण्यात आला त्याकरिता त्यांचे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.
