नागरिकांना रास्त धान्य दुकानावर धान्य मिळत नाही;मुदत वाढवून देण्याची बांदा सरपंच अक्रम खान यांची मागणी
सावंतवाडी ता.२८-: बांदा गावात गेले काही दिवस सरकार मान्य धान्य दुकानावर ई-पाॅज मशीन सर्व्हरचा त्रास उद्भवत असून, त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी यावर त्वरित तोडगा काढावा तसेच या महिन्यात धान्य वितरणासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी बांदा ग्रामपंचायत सरपंच अक्रम खान यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
