सावंतवाडी ता.२७-: मनसे सरचिटणीस आणि माजी आमदार परशुराम (जीजी) उपरकर यांच्या संकल्पनेतून आणि शहर मध्यवर्ती कार्यालय तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त “शिव आरोग्य सप्ताह” साजरा करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व तेजस्विनी हेल्थकेअर यांच्या संयुक्त विद्यमानाने “शिव आरोग्य सप्ताह” ओटवणे, विलवडे , आरोस धाकोरे येथे सुरू होऊन त्याची सांगता शहर मध्यवर्ती कार्यालय सावंतवाडी येथे करण्यात आली.
त्यावेळी सुमंत तरी सरचिटणीस माथाडी व वीज कामगार सेना यांच्या हस्ते तेजस्विनी हेल्थकेअर डॉक्टर रघुनाथ गावडे व त्यांच्या टीमचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदर जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भैरवकर सचिव आकाश परब महाराष्ट्र सैनिक दीपक गुराम युवती तालुकाध्यक्ष ललिता नाईक सामाजिक कार्यकर्ते अमित वेंगुरलेकर आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक कळणे विभाग अध्यक्ष अभय देसाई विलवडे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत धाकोरे शाखाध्यक्ष निलेश मुळीक मंदार सुभेदार गोविंद सोनी अनुप सोनी आणि इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. शिव आरोग्य सप्ताहला सर्व ठिकाणी उत्स्पूर्त प्रतिसाद मिळाला असून ५०० हून अधिक लोकांनी मोफत आरोग्य तपासणी शिबीरचा लाभ घेतला. नागरिकांचा प्रतिसाद पाहता आम्ही अशा प्रकारचे उपक्रम नेहमी राबवण्याचे आश्वासन मनसे शहर अध्यक्ष श्री आशिष सुभेदार यांनी आपल्या मनोगत मध्ये सांगितले.
