महाशिवरात्री निमित्त माजगाव महादेव मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…

सावंतवाडी ता.२७-:* माजगाव महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.माजगाव महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

त्यानिमित्त मंदिरात मंगळवार १ मार्च रोजी सकाळी शिवलीलामृत ग्रंथ पठण, शिवपिंडीवर अभिषेक, लघुरुद्र, महाआरती, सायंकाळी५ वा. कीर्तन, ६ वा. भजन, ८ वा. दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटी अध्यक्ष आनंद सावंत, सचिव विजय माधव व ग्रामस्थ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page