आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास….
*⚡सावंतवाडी ता.२६-:* माजगाव येथे नव्याने होणाऱ्या धरणासाठी गावातील जनतेच्या मागणीनुसार तातडीने निधी उपलब्ध करून दिला असून, त्यासाठी आपण स्वतः सबंधित मंत्र्याकडे पाठपुरावा केला होता. अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. या धरणातून दिवसातून पिण्यासाठी २६ एम एन डी एवढं पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच या धरणाचा फायदा माजगाव एम आय डी सी चा पाण्याचा तुटवडा भविष्यात कधीच होणार नाही. असा विश्वास त्यानी यावेळी व्यक्त केला आहे.
यावेळी ते पुढे म्हणाले की, या धरणासाठी एकूण १३ कोटी निधी खर्च करण्यात आला आहे. यामध्ये भू संधरणसाठी ६ कोटी ७ लाख रुपये खर्च करण्यात आला असून, धरणासाठी ७ कोटी निधी खर्च करण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
