ग्राहकांनी घाई न करता घ्यावे धान्य; आमदार दीपक केसरकर यांचे ग्राहकांना आवाहन…
सावंतवाडी ता.२६-:* रेशन धान्य दुकानावर धान्याचा पुरवठा करताना नेटवर्क प्रॉब्लेम मुळे धान्य वितरीत करताना अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे या महिन्यातील धान्य वितरीत करण्याची तारीख दहा दिवस वाढवून देण्याची मागणी केली असून, ती तारीख वाढवून मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी धान्य घेण्यासाठी काळजी करून घाई करू नये. असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत नागरिकांना केले आहे.
यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ,उप जिल्हाप्रमुख अशोक दळवी आदी उपस्थित होते.
