उडपी येथील ट्रॉलरला सहा लाखाचा दंड

मालवण ता.२६-:* सागरी मासेमारी नियमन कायद्याचे उल्लंघन करून अनधिकृतपणे मासेमारी केल्याप्रकरणी कर्नाटक उडपी येथील ‘कार्थिक शिवम’ या हायस्पीड ट्रॉलरच्या मालकास मत्स्य विभागाकडून ६ लाख ४२ हजार २५ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कुणकेश्वर गजबादेवीसमोरील सागरी हद्दीतील अनधिकृत मासेमारी करण्याच्या उद्देशाने चालत असताना नियमांचा भंग केल्याप्रकरणी मत्स्य विभागाच्या शीतल गस्ती नौकेने हा ट्रॉलर पकडला होता. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारित अध्यादेश २३ नोव्हेंबर २०२१ कलम १७ चा कलम ५ (एक) आणि ९ अ (एक) अन्वये नियमांचा भंग केल्यामुळे पकडलेल्या कर्नाटक उडपी येथील ‘कार्थिक शिवम’ हायस्पीड ट्रॉलरच्या मालक दयानंद सुवर्णा यांना ६ लाख ४२ हजार २५ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

You cannot copy content of this page