अमेय देसाई यांच्या पुढाकारातून बंद हायमास्ट पुन्हा प्रकाशमान

मालवण ता.२६-:* मालवण मच्छीमार्केट येथील बंद असलेला हायमास्ट टॉवर सुरू करण्याबाबत नगरपालिकेकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांनी पुढाकार घेत हा हायमास्ट पुन्हा प्रकाशमान केला आहे. मालवण मच्छिमार्केट येथील हायमास्ट टॉवर गेले अनेक दिवस बंद अवस्थेत होता. पालिका प्रशासनाकडून हायमास्ट दुरुस्तीबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने काळोखाचा सामना करत व्यापारी वर्गाला व नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.

काही नागांरिकांनी याबाबत युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांचे लक्ष वेधले. अमेय देसाई यांनी तात्काळ पुढाकार घेत बंद हायमास्ट प्रकाशमान करण्याची कार्यवाही पूर्ण करून घेतली. याकामी इलेक्ट्रिक तंत्रज्ञ सुभाष कुमठेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांचे सहकार्य लाभले असल्याचे अमेय देसाई यांनी सांगितले.

You cannot copy content of this page