मडुरा उपकेंद्रात कोरोना योद्ध्याँचा सन्मान

बांदा ता.२६-:* कोरोना कालावधीत मडुरा उपकेंद्र क्षेत्रात रुग्णांची संख्या वाढती होती.विलीगीकरणावेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. परंतु मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांनी अपेक्षित सहकार्य करून कोरोनाचे प्रमाण घटविले असे प्रतिपादन, मडुरा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस्विनी माजगावकर यांनी केले. मडुरा उपकेंद्रात शिवजयंती निमित्त डिगवाडी ग्रामस्थ मित्र मंडळातर्फे आयोजित कोरोना योध्दा सन्मान कार्यक्रमात डॉ. माजगावकर बोलत होत्या.

व्यासपीठावर सरपंच साक्षी तोरसकर, उपसरपंच विजय वालावलकर, सदस्या साक्षी परब, सानिका वेंगुर्लेकर, माधुरी वालावलकर, शशिकांत परब, मडुरा तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळू गावडे, पोलीस पाटील नितीन नाईक, कोरोना समिती सदस्य यशवंत माधव, आरोग्यसेवक बापू कांबळी, डॉ. विकास बर्वे, आरोग्य सहाय्यिका श्रीमती रंगसूर, आशा स्वयंसेविका रेश्मा परब, आत्माराम खर्डे, सिद्धेश सावळ आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्ध्याचा नारळाचे झाड देत डिगवाडी ग्रामस्थ मित्र मंडळातर्फे सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम वालावलकर यांनी केले तर आभार विजय वालावलकर यांनी मानले.

You cannot copy content of this page