वेंगुर्ला ता.२६-:* डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशन मुंबई विद्यापीठ आयोजित सी.के.टी.कॉलेज पनवेल येथे झालेल्या अंतर विद्यापिठ बेस्ट फिजिक शरीरसौष्ठव स्पर्धेत डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशनचा बी.पी.एड.प्रथम वर्षचा विद्यार्थी अंकित किशोर सोनसुरकर याने ८० किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावत सिंधुदुर्गचा पहिला खेळाडू बनण्याचा मान पटकावला आहे.
अंकित याला डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशनचे समन्वयक विजय तांदलेकर, योगीता खाडे, विशाल कटकडोड यांचे मार्गदर्शन लाभले.
