वेंगुर्ला ता.२६-:* नेहरु युवा केंद्र, सिंधुदुर्गतर्फे जागतिक मातृभाषा दिनानिमित्त घेतलेल्या निबंध लेखन स्पर्धेत चैताली पवार–प्रथम, सानिका वराडकर-द्वितीय, निकिता कबरे-तृतीय यांनी यश संपादन केले.
या सर्वांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी नेहरू युवा केंद्र वेंगुर्ला प्रतिनिधी श्रीहर्षा टेंगशे, तुषार परब प्रा.वामन गावडे, प्रा.सचिन परुळकर उपस्थित होते.
