जिव्हाळा सेवाश्रमास विठ्ठल पंचायतनतर्फे अन्नधान्य प्रदान

वेंगुर्ला ता.२६-:* सुरेश बिर्जे जिवन आधार चॅरीटेबल ट्रस्टच्या पिंगुळी येथील जिव्हाळा सेवाश्रम या अनाथश्रमास ६ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या उत्कृष्ठ कामकाजाच्या निमित्ताने खानोली-सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतनाचे व्यवस्थापक दादा पंडीत महाराज व तळवडे येथील उद्योजक राजाराम गावडे यांनी सदिच्छा भेट देत अनाथाश्रमातील अनाथ व्यक्तींसाठी नेहमीच्या वापरातील अन्नधान्य ट्रस्टचे व्यवस्थापक सुरेश बिर्जे यांच्याकडे सुपुर्द केले.

यावेळी श्री विठ्ठल पंचायतनाचे व्यवस्थापक दादा पंडीत महाराज व तळवडे येथील उद्योजक राजाराम गावडे यांनी जिव्हाळा सेवाश्रमाची पहाणी करून येथे लागणा-या अत्यावश्यक बाबींसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी सुरेश बिर्जे यांना दिले. यावेळी सदिच्छा भेट दिलेल्या या दोन्ही मान्यवरांचे सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यांत आला. यावेळी श्रीमती गितांजली बिर्जे, श्री. खोबरेकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page