Headlines

राष्ट्रीय मतदार जनजागृती स्पर्धांचे आयोजन

वेंगुर्ला ता.२६-:* राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय मतदार जनजागृती स्पर्धेअंतर्गत पाच प्रकारच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करुन सहभाग घ्यावा असे आवाहन सावंतवाडी उपविभागीय अधिकारी व वेंगुर्ला तहसिलदार यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाद्वारे २५ जानेवारी ते १५ मार्च या कालावधीत ऑनलाईन मतदार जनजागृती स्पर्धा घेण्यात येत आहेत. यामध्ये ‘माझे मत, माझे भविष्य, एका मताचे सामर्थ्य‘ या विषयावर प्रश्नमंजूषा, गीत, व्हिडीओ मेकिग, भित्तीचित्र आणि घोषवाक्य स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन केले आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी https://ecisveep.nic.in/contest/ या संकेतस्थळावर आपली ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. या स्पर्धांमध्ये शाळा, महाविद्यालये, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी यांना सहभागी व्हावे असे आवाहन भारत निवडणूक आयोगाने केले आहे.

You cannot copy content of this page