जिमखाना-लाखेवस्ती समस्यांच्या गर्तेत

पाण्यासह गटार, शौचालय आणि इमारतीच्या डागडुजीचा प्रश्न :वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा बबन साळगावकर यांचा इशारा

सावंतवाडी ता 26: शहरातील जिमखाना येथील लाखेवस्ती अनेक समस्यांच्या गर्तेत आहे. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासह गटार, शौचालय आणि इमारतीच्या डागडुजीचा प्रश्न अधांतरीच आहे. ह्या समस्या तात्काळ दूर करण्यासाठी प्रयत्न करू अन्यथा तुम्ही संघर्षाला तयार रहा आम्ही आंदोलन उभारू असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज लाखे वस्तीतील भेटी दरम्यान दिला. येथील नागरिकांच्या मागणीनुसार श्री.साळगावकर यांनी लाखे वस्तीला भेट देत तेथील रहीवाश्यांशी चर्चा केली

वस्तीवर नगर परिषद प्रशासनाकडून आवश्यक असलेला लक्ष दिला जात नाही. तुम्ही राजीनामा दिल्यानंतर आमच्याकडे एकही काम झालेले नाही आता तुम्हीच लक्ष द्या अशा स्वरूपाच्या तक्रारी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याकडे वस्तीतील तरुणांनी करत प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी विनंती केली यामुळे आज वस्तीतील रहिवाशांच्या विनंती वरून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी वस्तीला भेट देऊन पाहणी केली यावेळी शाखाप्रमुख अमित लाखे, रासाई देवी कला क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष कृष्णा लाखे, निलेश पाटील, शांताबाई लोकरे, रेश्मा डावरे, अर्चना बेळगावकर, रघुनाथ लाखे, मनोज लाखे आदींनी आपल्या व्यथा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या समोर मांडल्या यावेळी बोलताना बबन साळगावकर म्हणाले संघर्षाला तयार रहा तुमचं नेतृत्व करण्यास मी सक्षम आहे या वस्ती वरती आमचे 50 वर्षांपासून संबंध आहेत त्यामुळे वस्तीला वाऱ्यावरती सोडून देणार नाही वस्तीवरची सगळेच्या सगळे प्रश्न प्रशासनाकडून सोडून देऊ असे आश्वासन यावेळी दिले लाखे वस्तीवरील मूलभूत सुविधा त्यांना मिळायलाच हव्यात हा त्यांचा हक्क आहे आणि हक्क मिळवण्यासाठी प्रसंगी आम्ही आंदोलन उभारू असा इशारा बबन साळगावकर यांनी यावेळी दिला

You cannot copy content of this page