प्रा. रुपेश पाटील यांचे आयुर्वेद महाविद्यालयात प्रतिपादन
सावंतवाडी ता.२६-:* मानवी जीवनाला खऱ्या अर्थाने सर्वोत्तम दिशा देण्याचे काम विद्यार्थी दशेतील नेतृत्व गुणाचे संस्कार करीत असतात. आपण कॉलेजमधून साकारलेली प्रत्येक उपक्रमशील गोष्ट पुढील आयुष्यात आपल्याला नेत्रदीपक यश प्रदान करते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.रुपेश पाटील यांनी सावंतवाडी येथे केले.
शहरातील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘स्टुडंट कौन्सिलचे’ उद्घाटन व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.डी.पाटील होते. कार्यक्रमास स्टुडन्ट कौन्सिलचे चेअरमन डॉ.विशाल पाटील उपप्राचार्य डॉ.संजय दळवी, डॉक्टर आर.के.मिश्रा, डॉ.शीतल पाटील, डॉ.देवऋषी, डॉ.तोडणकर, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. गोलघाटे आदी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग कार्यक्रमास उपस्थित होते.यावेळी प्रा.रुपेश पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या ‘सप्तसिंधु’ ह्या स्टुडंट कौन्सिलचे उद्घाटन करण्यात आले. सोबतच जिमखाना हॉलचेही उद्घाटन प्रा.रुपेश पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजनाने झाली. यानंतर प्रा. रुपेश पाटील यांनी ‘विद्यार्थी दशेतील संस्कार’ या विषयावर आपले व्याख्यान दिले.
प्रा.पाटील पुढे म्हणाले की आयुर्वेद महाविद्यालय म्हटले म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा सुसंस्कार भिजवणारे महाविद्यालय असा समाज मनाची धारणा आहे. आपण विद्यार्थीदशेत घेतलेल्या प्रत्येक संस्कार हा आपल्या पुढच्या आयुष्याला महत्त्वपूर्ण दिशा प्राप्त करून देतो. आज विद्यार्थीदशेत जो कोणी स्टुडंट कौन्सिलवर काम करेल तो विद्यार्थी पुढच्या आयुष्यात सामाजिक नेतृत्वाला देखील सुयोग्य पद्धतीने पार पाडेल. एवढी ताकद विद्यार्थी दशेतील स्टुडंट कौन्सिलच्या नेतृत्वगुणात आहे, असेही प्रा.रुपेश पाटील यांनी सांगितले. यावेळी स्टुडंट कौन्सिलचे चेअरमन डॉ. विशाल पाटील, प्राचार्य डॉ.बी.डी.पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पायल गायकवाड हिने केले. सूत्रसंचालन रितिका शिंदे व प्रज्ञा शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन आदेश गवळी यांनी केले. यावेळी प्रा.रुपेश पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गेल्या शैक्षणिक वर्षात नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात अक्षय साटविलकर, तृष्णा भंडारे, प्रीती पाटील, निरंजन शर्मा, दुर्गेश ठाकुर, जयराज मरकड, कृष्णा अडकी, तारामती पदंपल्ली, प्रज्ञा शिंदे ह्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
