काथ्याच्या वस्तुंना मिळणार १०० टक्के आरक्षण

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतली दखल;माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले शिष्टमंडळाने वेधले होते लक्ष

सावंतवाडी ता.२५-:* महाराष्ट्रातील स्थानिक काथ्या उद्योजक तयार करत असलेल्या सर्व  वस्तुंना १००% आरक्षण देण्याचा सुधारित निर्णय राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आहे याबाबत सावंतवाडीतील माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्वाखाली उद्योजकांच्या एका शिष्टमंडळाने नामदार देसाई यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले होते यावर उद्योग  मंत्रालयाने सकारात्मक निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री  नामदार सुभाष देसाई यांनी कोकणामध्ये नारळापासून तयार होणाऱ्या काथ्या उद्योगाला योग्य भाव मिळावा व त्या अनुषंगाने स्थानिक नारळ उत्पादक शेतकरी यांच्या उत्पन्नता वाढ व्हाव्ही यासाठी  उद्योग मंत्री यांनी  शासकीय विभागाने कार्यालयीन खरेदी साठीच्या मूळ धोरणात बदल करून महाराष्ट्रातील स्थानिक काथ्या उद्योजक तयार करत असलेल्या सर्व  वस्तुंना 100% आरक्षण देण्याचा सुधारित निर्णय घेतला आहे.

याबाबतीत यापुर्वी माजी मंत्री प्रवीण भोंसले श्री एम के गावडे व जिल्हा उद्योग अधिकारी श्री परशुराम गावडे यांनी स्थानिक काथ्या उद्योगाला प्राधान्य व आरक्षण मिळावे असा प्रयत्न केला होता. आज  मंत्री  शिवनेरी येथील मुंबई निवासस्थानावर त्यांची भेट घेऊनअभिनंदन केले आहे. तसेच यापुढे  coir काथ्या पासून जी नवीन रस्ते बांधणीसाठी तसेच मातीचे धरण बांधण्यासाठी केरळमध्ये तामिळनाडू कर्नाटक या राज्यामध्ये उपयोग केला जातो त्या तऱ्हेने महाराष्ट्र राज्य शासनाने काथ्याचा अवलंब करणेसाठी  मंत्र्यांनी प्रयत्न करावे असे निवेदन आज देण्यात आले व तेही प्रयत्न करण्याचे  उद्योग मंत्र्यांनी मान्य केले आहे आहे. प्रवीण भोसले यांच्यासोबत यांच्यासोबत सतीश सारंग मनोज वाघमोरे उपस्थित होते.

You cannot copy content of this page