तर उपाध्यक्षपदी अजय नाणेरकर यांची निवड…
देवगड (प्रतिनिधी) तारामुंबरी सहकारी मच्छी व्यावसायिक संस्था मर्यादित, देवगड या संस्थेच्या अध्यक्षपदी विनायक यशवंत प्रभू, उपाध्यक्षपदी अजय सुधाकर नाणेरकर यांची बिनविरोध करण्यात आली. तारामुंबरी सहकारी मच्छि. व्यावसायिक संस्था अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड निवडणूक निर्णय अधिकारी पी. एल.जाधव यांच्या उपस्थितीत विशेष सभेत शुक्रवारी सकाळी करण्यात आली.
या वेळी संचालक धनंजय तुकाराम जोशी,राजाराम हरी आडकर गुरुनाथ नामदेव घाडी,संदीप सदाशिव मुंबरकर,रोहन शंकर तारी, सौ. हर्षदा हरेश्वर खवळे,सौ .शिल्पा शशिकांत धुरत, व्यवस्थापक अरुण गुरुनाथ तोरस्कर उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर उपस्थित निवडणूक निर्णय अधिकारी, संचालक व्यवस्थापक व सर्व कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.
