निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बबन साळगावकरांची स्टंटबाजी

भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे ; भाजपच्या विकासकामाना विरोधकांकडून खो घालण्याचा प्रयत्न

सावंतवाडी ता.२३-: शहरात भाजपकडून सुरू असलेल्या विकास कामाना विरोधकांकडून खो घालण्याचा प्रयत्न सुरू असून, गेली ७ वर्ष नगराध्यक्ष असताना बबन साळगावकर यांनी शहरातील पाणी प्रश्न का सोडवला नाही ? असा सवाल भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी उपस्थित केला असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बबन साळगावकर हे स्टंटबाजी करत असल्याची टीका अजय गोंदावळे यांनी केली आहे. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, आमदार दीपक केसरकर यांच्याशी बबन साळगावकर यांचे मतभेद असल्याने अनेक विकास कामांसाठी आलेला निधी मागे गेला आहे. सावंतवाडी शहर भकास करण्यामागे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचाच हात असल्याने, शहरातील जनतेने दोन वेळा डिपॉझिट जप्त करून जागा दाखवून दिली असल्याची जोरदार टीका केली आहे. यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, बंटी पुरोहित आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page