नव उद्योजक,बेरोजगार तरुण- तरुणी,संधीचा फायदा घ्यावा:राजन तेली
कणकवली 22 फेब्रुवारी (प्रतिनिधी)– केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आपल्या सुष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून कोकणातील शेतकरी, मच्छिमार,उद्योजक, व्यावसायिक आणि नव उद्योजक,बेरोजगार तरुण- तरुणी यांना केंद्र बिंदू ठेवून रोजगार देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.त्यासाठी २४ ते २६ फेब्रुवारी रोजी उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित केला आहे.
कुडाळ, ओरोस,आणि कणकवलीत हे कार्यक्रम केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत आणि या खात्यांचे मुख्य सचिव व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहेत.त्यासाठी केंद्रीय उद्योग खात्याचे मंत्रालय कोकणात प्रथमच येत आहे.त्याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जनतेने करून घ्यावा असेल आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे. जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात कायोजित पत्रकार परिषदेत बोलतांना राजन तेली म्हणाले,राज्य सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरत असतांना मोदी सरकार मात्र जनतेला मदत करत आहे.शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिमहिना आर्थिक मदत देणारी किसन सन्मान योजना असो किंवा रेशनवर प्रतिमहिना मोफत धान्य देऊन देशातील जनतेची मोदी सरकारने काळजी घेतली आहे. तर उद्योजकांना २० हजार कोटींची पॉकेच दिले आहे.
आता केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या खात्याचे वरिष्ठ अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन नवे उद्योग करण्यासाठी येथील तरुण तरुणींनी मार्गदर्शन करणार आहेत.त्याचा फायदा करून घ्या. केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाचे अधिकारी चारदिवस विविध कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन करतील यात,२५ फेब्रुवारी रोजी कुडाळ नवीन एसटी स्टँड येथे कॉयर उद्योग प्रदर्शनाचे उदघाटन सकाळी १० वाजता होणार आहे. त्याला ते उपस्थितीत राहणार आहेत हे प्रदर्शन आठ दिवस सुरू राहणार आहेत. त्यानंतर कुडाळ एमआयडीसी येथे कोनबँक स्फूर्ती बांबू क्लस्टर चे उदघाटन केले जाणार आहेत.
त्यानंतर ओरोस येथे शरद कृषी भवन मध्ये उद्योजकता विकास कार्यशाळेचा मुख्य कार्यक्रम सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. यावेळी विविध प्रशिक्षने झालीत त्याची प्रमाणपत्रे वितरण,मधमाशा पालन करण्यासाठी पेट्या,कुंभार उद्योगासाठी चाके,अगरबत्ती तयार करणारी मशीन,शेतकऱ्यांना बांबू रोपांचे वाटप,केले जाणार आहे.त्यानंतर दुपारी १२ वाजता याच ठिकाणी एम एस एम इ आणि ईडीपी कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे.रूपे कार्ड आणि लॉन्च आणि उद्योजकांना रूपे कार्ड चे वितरण केले जाणार आहे.संध्याकाळच्या सत्रात कॉयर बोर्ड चे सादरीकरण, एमएफडीसी चे सादरीकरण, मशरूम लागवडीचे सादरीकरण केले जाणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे पूर्णकाळ उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमाच्या सहभागासाठी १५०० उद्योजकांनी सहभाग नोंदविला आहे. २६ फेब्रुवारी रोजी कणकवलीत प्रहार भवन येथे कॉयर बोर्डाच्या प्रादेशिक कार्यालयाचे उदघाटन केले जाणार आहे. त्यानंतर अनुसूचित जाती,जमाती उद्योजकांसाठी विक्रेता कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.कथा प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कणकवली येथे कायमस्वरूपी सुरू केले जाणार आहे.अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
