सिंधुदुर्गनगरी ता.२२-: ओरोस खालची परबवाडी येथील श्री देव महापुरुष मंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त 24 व 25 फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
24 रोजी सकाळी 8 वाजता गणेश पूजन व अभिषेक,9 वाजता श्री सत्यनारायण महापूजा ,दुपारी 1 ते 3 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 4 ते 5 हळदीकुंकू समारंभ,सायंकाळी 6 वाजता स्थानिक भजने,सायंकाळी 7 .30 वाजता दत्तमाऊली पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा श्री देवी कामाख्या हा नाट्यप्रयोग .
शुक्रवार दिनांक 25 फेब्रुवारीला सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबीर ,सायंकाळी 7 वाजता बुवा विजय (गुंडू )सावंत,आणि बुवा विनोद चव्हाण यांचा 20-20 डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव महापुरुष कला व क्रीडा मंडळाने केले आहे .
