सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी किल्ले सिंधुदुर्गमध्ये केली साफसफाई

मालवण ता.२२-:* जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या माध्यमातून पुरातत्व विभागाच्या सहकार्याने शिवजयंती निमीत्त घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छता अभियानामध्ये मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत किल्ल्यात स्वच्छता केली. या अभियानात यामध्ये सिंधुदुर्ग महाविद्यालयातील एनसीसीचे २० व एनएसएस चे १७ विद्यार्थी तसेच सांस्कृतिक विभागाचे विद्यार्थी असे ४७ विद्यार्थी सहभागी झाले होते.

तर प्राध्यापक समन्वयक म्हणून प्रा.आर. एन.काटकर व प्रा.एच.एम.चौगले या मोहिमेमध्ये सहभागी होते. सिंधुदुर्ग किल्ल्यातील विहिरी शेजारच्या वाडा भागात या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवित वाढलेले गवत, कचरा, छोटी काटेरी झुडपे एकत्र केली. सिंधुदुर्ग किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरास विद्यार्थ्यांनी भेट दिली. यादरम्यान आमदार वैभव नाईक तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

You cannot copy content of this page