*💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* : महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष एन. एम. पवळे यांनी अतिरिक्त महासचिव रावजी यादव यांना दिलेल्या आदेशानुसार त्यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण महासंघाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे कल्याण महासंघाच्या सभेमध्ये सवार्नुमते निवडण्यात आली. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- जिल्हाध्यक्षपदी- न्हानु सरमळकर, जिल्हा सचिवपदी-विजय कदम, उपसचिवपदी-नंददिपक जाधव, खजिनदारपदी-शितल सावंत तर कार्याध्यक्षपदी-उदय सर्पे, उपाध्यक्ष-चंद्रकांत कांबळे, मनिषा परब उर्फ उषा लाड, सिताराम जानकर, महानंदा चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिन तांबे, नित्यानंद भगत, सुप्रिया धुरी, रविंद्र साळगावकर, रविंद्र शिंगे यांची कार्यकारिणी सदस्यापदी निवड झाली आहे. यावेळी सर्व पदाधिकारी यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची कार्यकारिणी जाहीर…!
