आगामी नगरपालिका निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी

राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी : केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन काम करणाऱ्यांना संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत

सावंतवाडी ता.२२-:* आगामी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी योगदान देणाऱ्या आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सक्षमपणे काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन काम करणाऱ्या एकाला ही संधी मिळणार नाही. असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिला आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, आगामी सावंतवाडी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ही २० च्या २० जागा स्वबळावर लढवणार असून, जास्तीत जास्त जागा आम्हालाच मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page