कणकवली 22 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- कणकवली तालुक्यातील नांदगाव मधलीवाडी येथील मारुती बाळा बोभाटे यांचे मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले आहे ते 82 वर्षांचे होते. त्यांनी 1955 मधे इयत्ता सातवी पासून जनसंघाचे काम सुरू केले होते. एक प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.
भारतीय जनता पक्षाचे सुध्दा कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते.त्यावेळी त्यांनी मुंबई येथील तात्कालीन आमदार वामनराव परब यांच्या बरोबर काम केले होते.त्यांना 2015 मधे ठाणे गुणीजन पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या निधनाने नांदगाव तसेच मुंबई येथील विभागातून हळहळ व्यक्त होत आहे.
