दिगशी गावात शिवजयंती उत्साहात

शिवप्रेरीत युवा संघटनेचे आयोजन

वैभववाडी ता.२१-:* दरवर्षीप्रमाणे दिगशी गावातील शिवप्रेरीत युवा संघटना यांनी आयोजित केलेला शिवजयंती उत्सव सोहळा थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता वैभववाडी तालुक्याचे तहसीलदार श्री. रामदास झळके व पोलीस अधिकारी PSI श्री. देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व पूजन करून करण्यात आली. यावेळी शिवरांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. यावेळी दिगशी गावच्या ग्रामस्थांनी संघटनेच्या वतीने तहसीलदार श्री. झळके व पोलीस अधिकारी श्री. देसाई यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते तिथवली दिगशी गावचे पोलीस पाटील श्री. गणेश हरयाण हे निवृत्त झाल्याने त्यांनी केलेल्या प्रामाणिक कार्याबद्दल त्यांचा सन्मान, सत्कार केला, तसेच तिथवली उपकेंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी व गावातील सर्व शिक्षक यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार व सन्मान करण्यात आला.

या नंतर संध्याकाळी ४ वाजता पौंबुरले गावचे ढोल पथकाने उत्कृष्ट असे ढोल नृत्य सादर करत या कार्यक्रमाची शोभा वाढवली. *सायंकाळी 5 वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता या वेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. *या नंतर महिलांसाठी तसेच मुलींसाठी संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम येऊन सौ. सायली धुरी या पैठणीच्या मानकरी ठरल्या. त्यासोबत दर्शना रामाने द्वितीय , गीता पाटील तृतीय हे विजेते ठरले. मुलींमध्ये कु. रिता धावडे प्रथम आली, कु.साक्षी धुरी द्वितीय, तन्वी मोरे तृतीय यांनी बक्षिसे मिळवली.

या स्पर्धांसाठी श्री.सुरेश मांडवकर यांनी सर्व बक्षिसे उपलब्ध करून दिली. *या कार्यक्रमाला शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा नेते, युवानेते श्री.संदेश पारकर, शिवसेना जिल्हा नेते श्री. अतुल रावराणे, युवासेना माजी जिल्हाप्रमुख श्री. हर्षद गावडे, माजी उपसभापती सौ. हर्षदा हरयाण , श्री.संदीप सरवणकर , श्री. बाळा हरयाण, सरपंच श्री.सुरेश हरयाण , संतोष हरयाण आदींनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. *या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्वांचे तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व ग्रामस्थांचे व कार्यकर्त्यांचे संघटनेचे अध्यक्ष श्री. स्वप्नील धुरी यांनी आभार मानले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page