आशा स्वयंसेविकेना कोविड प्रोत्साहन भत्ता द्या

नगराध्यक्षांना आशा स्वयंसेविकेंचे निवेदन

देवगड ता.२१-: देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील आशा स्वयंसेविकाना नगरपंचायत निधीमधून देण्यात येणारा कोव्हिडं -१९ प्रोत्साहन भत्ता मिळावा या मागणीचे निवेदन देवगड जामसंडे हद्दीतील १० आशा स्वयंसेविकानी नगराध्यक्ष देवगड जामसंडे नगरपंचायत यांचेकडे दिले आहे.

या निवेदनात नमूद केल्या प्रमाणे गेली दोन वर्षे जागतिक कोव्हिडं १९ संक्रमण काळात आशा स्वयंसेविकानी आरोग्य यंत्रणेसोबत सेवा बजावली आहे.तसेच अन्य सर्वेक्षण कामगिरी ही पार पडली आहे.या काळात आशा स्वयंसेविकाना एप्रिल २०२० व २०२१ मध्ये प्रत्येकी दोनदा रु १०००/- (एक हजार )भत्ता ग्रामपंचायत स्तरावर दिला आहे.जे काम ग्रामपंचायत स्तरावर आशानी केले तेच काम नगरपंचायत स्तरावर आशा स्वयंसेविकानी केले आहे.महाराष्ट्रातील काही नगरपंचायत मध्ये कोव्हिडं -१९ चे काम सूरु झाल्या पासून रु १०००/- प्रोत्साहन भत्ता दिला जातो त्याच निकषानुसार देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील आशांना प्रोत्साहन भत्ता मिळावा .अशी मागणी त्यांनी केली आहे .

या मागणीनुसार आवश्यक ती माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन नूतन नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी दिले.या वेळी आशा अंगणवाडी सेविका शिष्टमंडळात सौ नीलिमा नागेश सारंग,सौ मनाली महेंद्र इलावंडेकर,सौ दिशा दीपक जगताप,सौ विशाखा विनायक बांदिवडेकर,सौ .प्रज्ञा प्रकाश धोपटे, सौ अनुष्का संदीप जाधव,सौ योगिता गणेश राऊत,सौ समिधा संदीप सावंत,सौ धनश्री संतोष मांडवकर,सौ सानवी सुदर्शन कोयघाडी उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page