आ.नितेश राणे यांचे प्रयत्न
कणकवली ता.२१-:* भारतीय जनता पार्टीच्यावतीने आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून सर्वसामान्यांना परवडणारे वॉटर फिल्टर व घरघंटी 50 टक्के सवलत दरात विक्रीचे वितरण कणकवली पंचायत समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्टॉल उभारून करण्यात आले.
या स्टॉलचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी सभापती मनोज रावराणे,उपसभापती मिलिंद मेस्त्री, बँक संचालक विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण , संदीप सावंत, समीर प्रभुगावकर, संदीप मेस्त्री, अभय गावकर ,राजश्री धुमाळे, अण्णा कोदे,संतोष चव्हाण, बबलू सावंत, गणेश तळगावकर, सचिन पारधीये, राजेश हिरलेकर आदी उपस्थित होते.
