पेट्रोलपंप ते वेळवाडी रस्ता करा

नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

देवगड ता.२१ देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील पेट्रोलपंप ते वेळवाडी रस्ता काम सुरू करावे .अशी मागणी नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यधिकारी देवगड जामसंडे नगरपंचायत यांचेकडे केली आहे.

या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे रा. मा. क्र.१७८ ते जामसंडे कावलेवाडी इ.जि. मा.१५ मिळणारा मार्ग क्र १६३ रस्ता डांबरीकरण नुतनीकरण करणे व साईडपट्टी बी.बी.एम.करणे (पेट्रोल पंप ते वेळवाडी)हे काम मंजूर असून ते काम बरेच दिवस बंदावस्थेत आहे.त्यामुळे त्या रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.तरी रस्त्याचे काम कोणत्या कारणास्तव बंद आहे व केव्हा चालू होईल याची लेखी माहिती मिळावी व या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी ही नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page