देवगड– : रापम मालवण आगारातून सकाळी ८.०० सुटणारी मालवण आचरा मार्गे देवगड पडेल नाटे जैतापूर पावस मार्गे रत्नागिरी या मार्गावर मालवण रत्नागिरी ही प्रवासी फेरी २२ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली आहे.
सदर प्रवासी फेरी देवगड येथे मालवणहून स.९.४५ वा. येणार आहे.तसेच परतीच्या प्रवासा करीता साय .५वा. देवगड हुन मार्गस्थ होणार आहे .या प्रवासी फेरीचा फायदा घ्यावा असे आवाहन मालवण देवगड आगाराने केले आहे.
