बॅ. नाथ पै युवाशक्ती पुरस्कार’ यशराज प्रेरणा संघटनेला प्रदान

बॅ. नाथ पै जन्मशताब्दी सोहळा विशेष कार्यक्रमाअंतर्गत आयोजन

मालवण ता.२०:-* अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण तालुका शाखेचा ‘बॅ. नाथ पै युवाशक्ती पुरस्कार’ मालवण तालुक्यातील आचरे येथील ‘यशराज प्रेरणा’ ह्या युवा संघटनेला बाबूकाका अवसरे, बाबाजी भिसळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण तालुका शाखेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘बॅ. नाथ पै युवाशक्ती पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे .

यावेळी व्यासपीठावर लक्ष्मीकांत खोबरेकर, डॉ. शामराव जाधव, श्रीकांत सांबारी, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, यशराज प्रेरणा ग्रुपचे अध्यक्ष मंदार सरजोशी, सायली आचरेकर, निलेश सरजोशी, सुरेश गावकर शिल्पंन गावकर, सर्व कोमसाप पदाधिकारी कार्यकर्ते  कथामाला मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर उपस्थित होते.

You cannot copy content of this page