तारकर्ली येथील मत्स्यव्यवसाय शाळेत शिवजयंती साजरी

मालवण (प्रतिनिधी) तारकर्ली येथील शासकीय मत्स्यव्यवसाय शाळेत शिवजयंती उत्सव साजरा झाला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशासह शिवकाळातील विविध वेशभूषा साकारत सर्वांचे लक्ष वेधले. तारकर्ली येथील मत्स्यव्यवसाय शाळेत विविध कार्यक्रम विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून पार पडतात.

शिवजयंती उत्सवानिमित्त देखील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या काळातील विविध व्यक्तिरेखांच्या वेशभूषा साकारत हा उत्सव साजरा केला. लहान मुलांनी साकारलेल्या या वेशभूषा लक्षवेधी ठरल्या. यावेळी शाळेच्या मुख्यध्यापिका सौ.कासकर, शिक्षिक सौ.लंगवे, श्री.गोसावी, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page