मालवण (प्रतिनिधी) आज पत्रकारिते समोर अनेक आव्हाने उभी असताना अत्यंत खडतर परिस्थितीतही जिल्ह्यातील पत्रकार समाज प्रबोधनाचे कार्य करत असून विकासाभिमुख पत्रकारिता करत आहेत, ही कौतुकाची बाब आहे. पत्रकारांनी आपल्यातील धाडसी वृत्ती कायम ठेवीत समाजाभिमुख पत्रकारितेचे व्रत जोपासावे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी येथे बोलताना केले. ६ जानेवारी हा पत्रकार दिन सर्वत्र साजरा केला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला आज मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिन आणि मालवण तालुकास्तरीय पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. गणेश जेठे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मालवणचे सभापती अजिंक्य पाताडे , जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य बाळ खडपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दैवज्ञ भवन, मालवण येथे संपन्न झाला. यावेळी श्री. जेठे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन दीपप्रज्वलन करून झाल्यानंतर आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर, कै. भाईसाहेब खांडाळेकर व कै. नरेंद्र परब यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई, सचिव प्रशांत हिंदळेकर, उपाध्यक्ष अमित खोत, खजिनदार कृष्णा ढोलम, सहसचिव सिद्धेश आचरेकर, बंटी केनवडेकर आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रफुल्ल देसाई यांनी प्रास्ताविक करत मालवण पत्रकार समितीच्या कार्याचा आढावा घेत वर्षभरात पत्रकारांसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी पत्रकार विनोद दळवी याना कै. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, पत्रकार अमोल गोसावी यांना स्व. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार, तर पत्रकार झुंजार पेडणेकर यांना बेस्ट स्टोरी अवार्ड प्रदान करून गौरविण्यात आले. पुरस्कार विजेत्यांना शाल, श्रीफळ, रोप, व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या सन्मानित करण्यात आले. तसेच जेष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन, पत्रकार पी. के. चौकेकर, डी. टी. मेथर, सौगंधराज बादेकर, विवेक नेवाळकर या पत्रकारितेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तर कुडाळ तालुका पत्रकार समितीचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार जाहीर झालेल्या समीर म्हाडगुत यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच दहावी, बारावी आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या कु. वैभवी पेडणेकर, कु.ऋतू देसाई, मृदुला मालंडकर, सिद्धी हिवाळेकर, मेघनाद बादेकर या पत्रकारांच्या पाल्याचाही सत्कार करण्यात आला. तर राज्यातील सर्व्हेक्षणात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची आदर्श पत्रकार संघ म्हणून निवड झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष गणेश जेठे यांचा तसेच बाळ खडपकर यांचा मालवण पत्रकार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना गणेश जेठे म्हणाले, मालवणच्या पत्रकारांची एकजूट वाखाणण्याजोगी आहे. येथील पत्रकार समाजातील प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडत आहेत. म्हणूनच आज जिल्ह्यात मालवणच्या पत्रकारितेचा आवाज आहे. ही एकजूट पत्रकारांनी कायम ठेवावी. पत्रकारांनी केवळ बातमीदारी न करता शोध पत्रकारिता करत समाजातील दुर्लक्षित प्रश्नांवर आवाज उठविणे गरजेचे आहे. त्यामुळे शोध पत्रकारितेवर भर देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे यांनी मालवण पत्रकार समितीचे कार्य जिल्ह्यात अव्वल आहे. येथील पत्रकार चाय बिस्कीटवाले पत्रकार नाही. जे सत्य, चांगले आणि उदात्त आहे त्याला पत्रकार प्रसिद्धी व न्याय देतात. मालवण पंचायत समितीच्या यशात पत्रकारांचे बहुमोल योगदान आहे, कोरोना काळात पत्रकारांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगत पत्रकारांच्या कामगिरीचे कौतुक केले यावेळी पुरस्कार विजेत्यांनी तसेच सत्कारमूर्तींनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी रविकिरण तोरसकर, सौ. लक्ष्मी पेडणेकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे व पदाधिकारी यांच्यावतीने पुरस्कार प्राप्त विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंटी केनवडेकर यांनी केले तर आभार कृष्णा ढोलम यांनी मानले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हा चिटणीस बाळू अंधारी, पल्लवी तारी, देवानंद लुडबे, भाजपच्या महिला तालुकाध्यक्षा सौ. लक्ष्मी पेडणेकर, मनसेचे अमित इब्रामपुरकर, विल्सन गिरकर, विशाल ओटवणेकर, मच्छिमार नेते रविकिरण तोरसकर, उमेश मांजरेकर, आगोस्तीन डीसोजा, भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही.जी. खोत, पत्रकार विकास गावकर
पत्रकारांनी आपल्यातील धाडसी वृत्ती कायम ठेवत समाजाभिमुख पत्रकारितेचे व्रत जोपासावे – गणेश जेठे…
