निवणुकीच्या ऐन रणधुमाळीत भाजपचा शिवसेनेला जोरदार धक्का

*इन्सुली शिवसेना शाखा प्रमुख सहदेव सावंत सह अनेक शिवसैनिक भाजपवासी

*💫सावंतवाडी दि.०५-:* ग्रामपंचायत निवडणुकांची ऐन रणधुमाळी सुरु असतानाच इन्सुली गावात शिवसेनेला भाजपने जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे युवा नेते आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत इन्सुली शिवसेना शाखाप्रमुख सहदेव सावंत यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला आहे. यात माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान पेडणेकर, उद्योजक नंदू नाईक, नागेश सावंत, झिलू सावंत यांच्यासह अनेक शिवसैनिकांचा समावेश आहे. या प्रवेशावेळी सावंतवाडी सभापती मानसी धुरी, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, बांदा मंडल उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, विजय गावकर, तात्या वेंगुर्लेकर, महेश धुरी, प्रताप सावंत, निगुडेचे माजी सरपंच झेवियर फर्नांडिस, बूथ अध्यक्ष अमेय कोठावळे, अजय सावंत, अभय आजगांवकर, महिला शक्ती केंद्रप्रमुख सुचित्रा शिंदे आदी उपस्थित होते. या प्रवेशामुळे इन्सुली ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसणार असून लवकरच आणखीही काहीजण भाजपात प्रवेश करणार असल्याचे यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page