जिल्हा परिषद शिक्षण सभापती अनिषा दळवी यांचे उपोषणकर्त्याना लेखी आश्वासन
सावंतवाडी ता.१६-:* सांगेली जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर १ च्या जीर्ण झालेल्या छप्पर दुरुस्तीसाठी 31 मार्च पूर्वी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ असे लेखी आश्वासन जिल्हा परिषद शिक्षण सभापती सौ.अनिषा दळवी यांनी दिल्यानंतर येथील पंचायत समिती कार्यालयासमोर शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्गाकडून छेडण्यात आलेले लाक्षणिक उपोषण मागे घेण्यात आले.
