बौद्ध सेवा संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले जयंती उत्सवाचे आयोजन…

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्यावतीने छञपती शिवाजी महाराज व महात्मा फुले जयंती उत्सव दिनांक १९ व २० फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा.दिप प्रज्वलन व प्रतिमा पूजन.११.१५ पदाधिका-यांचे मनोगत व समारोप. तर दिनांक २० रोजी सकाळी ११ वा.दिप प्रज्वलन, प्रतिमा पूजन, गीत गायन, तसेच डाॕ.टी.एस.पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून शिवचरिञावर व्याख्यान देणार आहेत.

तसेच डाॕ.रवींद्र जाधव व डाॕ.सुरेखा जाधव यांचे मनोगत व मार्गदर्शन होणार आहे.यावेळी उपस्थितीत मान्यवरांना गोविंदराव पानसरे लिखीत शिवाजी कोण होता हे पुस्तके भेट म्हणून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थितीत राहावे.असे आवाहन वैभववाडी तालुका बौध्दसेवा संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव व सेक्रेटरी रविंद्र पवार यांनी केले आहे.

You cannot copy content of this page