प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा अंतर्गत मयत कर्जदाराच्या वारसांना चार लाखाचा धनादेश सुपूर्द …

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते देण्यात आला धनादेश…

वैभववाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या दोन मयत कर्जदारांच्या वारसांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा अंतर्गत चार लाखाचा धनादेश बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

हेत येथे सिंधु वैभव दुग्ध उत्पादक सहकारी संस्था यांच्या वतीने जिल्हास्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित होते. मयत कर्जदार श्री. अमित गंगाधर खानविलकर रा. हेत यांचे वारस श्रीमती अर्पिता अमित खानविलकर यांच्याकडे दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तर मयत कर्जदार सुरज सुरेश पांचाळ रा. सडुरे यांचे वारस श्रीमती सुचिता सुरेश सुतार यांच्याकडे दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दोन्ही धनादेश वारसांकडे सुपूर्द केले.

यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिरुद्ध देसाई, वैभववाडी पं. स. माजी सभापती भालचंद्र साठे, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष महेश संसारे, हेत सरपंच किशोर कांबळे, सिंधु वैभव दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेचे संस्थापक रामचंद्र फोंडके, बँकेचे विकास अधिकारी एस. टी. कुडतरकर, भुईबावडा विकास अधिकारी श्री. पी. पी. कुडतरकर आदी उपस्थित होते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतून विमा रक्कम मिळाल्याबद्दल

You cannot copy content of this page