संगीत मित्रमंडळाच्या वतीने लता दीदींना वाहण्यात येणार संगीतमय श्रद्धांजली….

सावंतवाडी ता .१५ सकाळ वृत्तसेवा सावंतवाडी ता 15: येथील श्रीराम वाचन मंदिर सभागृहात लता मंगेशकर यांना गुरुवारी दि 17 रोजी संगीत मित्र मंडळाच्या वतीने संगीत श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. यावेळी लता मंगेशकर यांनी गायलेली गीते गाऊन ही श्रद्धांजली देण्यात येणार आहे सर्व संगीतप्रेमींनी कार्यक्रमाला येऊन लता मंगेशकर यांना श्रद्धांजली द्यावी अशी विनंती मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद चोडणकर यांनी केली आहे

या संगीत कार्यक्रमात संगीत साथ हार्मोनियम किरण सिद्धये तबला अक्षय सरवणकर राहिल चोचे तर ढोलकसाथ संकेत म्हापणकार करणार आहेत तर ध्वनिक्षेपण व्यवस्था प्रसाद खोटलेकर यांची असणार आहे

You cannot copy content of this page