मालवण (प्रतिनिधी) जिल्ह्यातील महिलांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी शिवसेना काम करत असून सिंधुरत्न योजनेतून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. महिलांनी कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी सोडू नये. महिलांना शिवसेना सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी मसुरे येथे महिला मेळाव्यात बोलताना दिली. मसुरे येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या महिला मेळाव्याला मसुरे पंचक्रोशीतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी सौ. स्नेहा नाईक, महिला जिल्हाप्रमुख सौ. जान्हवी सावंत , शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, तालुका संघटक दीपा शिंदे, तालुका समनवयक पूनम चव्हाण, उपजिल्हा संघटक सेजल परब, पंचायत समिती सदस्य गायत्री ठाकुर, सरपंच संदीप हडकर, उपसरपंच राजेश गावकर, सुहास पडणेकर, सचिन पाटकर, राघवेंन्द्र मुळिक, बाळू भोगले, अनिल मेस्त्री, सुरेश असलदेकर, माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, उपतालुका संघटक पूजा तोंडवळकर, सौरभी आंबरे, शहर शाखाप्रमुख पेडणेकर, राजश्री आजगावकर उपशहर प्रमुख नंदा सारंग, शाखा संघटक विद्या फर्नांडिस, गायत्री ठाकूर,आनंदी परब, अदिती मेस्त्री, पूजा ठाकूर, मानसी चव्हाण आदी पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या. या मेळाव्यामध्ये महिलांसाठी पैठणी स्पर्धा घेण्यात आली. तसेच हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी घेतलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमात अनुक्रमे प्रथम मयुरी गुराम, द्वितीय समृद्धी आचरेकर, तृतीय हर्षाली मुळीक या विजेत्या ठरल्या. या कार्यक्रमाला मसुरे पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
