पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आचरा शाळेत वाहिली श्रद्धांजली

मालवण ता.१४-:* पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या ४५ जवानांना केंद्रशाळा आचरे नं. १ या प्रशालेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी ४५ मेणबत्त्या प्रज्वलित करून मानवंदना दिली. पुलवामा येथील अतिरेक्यांच्या आत्मघातकी हल्ल्यात भारताचे ४५ जवान शहीद झाले होते.

या घटनेचे स्मरण करताना उपस्थित शिक्षकांनी भारतीय सुरक्षा व्यवस्थेवर गेल्या दोन दशकात झालेल्या हल्ल्यांच्या आठवणी सांगितल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रथमेश घाडी, उपाध्यक्षा सौ. मनाली मिराशी, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश परुळेकर, संदीप पांगम, मुख्याध्यापिका स्मिता जोशी व पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page