वाभवे-वैभववाडी न.पं. नगराध्यक्षपदी नेहा माईनकर तर उपनगराध्यक्षपदी संजय सावंत

वैभववाडी ता.१४-:* वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या नेहा माईनकर विजयी झाल्या आहेत तर उपनगराध्यक्षपदी भाजपाचे संजय सावंत यांची निवड झाली आहे. येथील नगर पंचायत सभागृहात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैशाली राजमाने व सुरज कांबळे यांनी काम पाहिले. भाजपाच्या नेहा माईणकर यांना दहा मते मिळाली. तर शिवसेनेच्या सानिका रावराणे यांना पाच मते मिळाली. तसेच उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय सावंत यांना दहा मते मिळाली. तर सेनेचे रणजीत तावडे यांना पाच मते मिळाली.

अपक्ष नगरसेविका अक्षता जैतापकर व अपक्ष नगरसेवक सुभाष रावराणे या दोघांनी मतदान केले नाही. नेहा माईणकर व संजय सावंत यांची निवड जाहीर होताच भाजपा पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी तालुकाध्यक्ष नाशिर काझी, माजी जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र रावराणे, विकास काटे सुनील भोगले प्रकाश माईनकर,प स सदस्या हर्षदा हरियाण, भालचंद्र साठे, संताजी रावराणे ,राजू माईनकर, राकेश मानकर आधी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

You cannot copy content of this page