Headlines

बक्षिसदात्यांचा गुण हेरुन सहकार्य करावे-शंकर कांबळी

वेंगुर्ला ता.१३-:* देणगीदारांनी गुणवंत व होतकरु विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवली आहेत. पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी या हेतूने बक्षिसांची रक्कम मोठी आहे. बक्षिसदात्यांचा हा गुण हेरुन भविष्यात विद्यार्थ्यांसाठी शाळा संस्थेचे योगदान लक्षात घेऊन सहकार्य करावे असे आवाहन माजी आमदार शंकर कांबळी यांनी शिरोडा येथे केले.

शिरोडा येथील गुरुवर्य वि.स.खांडेकर विद्या प्रतिष्ठान संस्थेचा बक्षिस वितरण सोहळा ५ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, संस्था अध्यक्ष चंद्रकांत ओटवणेकर यांच्यासह बा.म.गोगटे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिरोडा हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व तिनही हायस्कूलचे मुख्याध्यापक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कै.राधाबाई गोविद प्रभूसाळगांवकर, कै.गोविद हरी प्रभूसाळगांवकर, रघुवीर तथा भाई मंत्री, कै.च.वि.बावडेकर स्मरणार्थ श्रीमती नंदिनी श्रीनिवास नाडकर्णी यांच्याकडून, कै.सौ.मंदाकिनी विष्णू खांडेकर, वा.श.नाबर व गुरुवर्य वि.स.खांडेकर विद्या प्रतिष्ठान शिरोडा पुरस्कृत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

माजी आमदार कांबळी यांचा ओटवणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत व्हावी या हेतूने देणगीदारांनी संस्थेकडे ४० लाखांचा निधी ठेवला असून त्यापैकी ३२ ाख रुपये स्थिर देणगी आहे. त्याच्या व्याजातून संस्थेच्या शिरोडा, रेडी, आरवली-टांक हायस्कूलच्या शालांत परीक्षेतील प्रथम तीन विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येत असल्याची माहिती चंद्राकांत ओटवणेकर यांनी दिली. प्रा.जे.जी.पाटील यांनी प्रास्ताविक तर सचिव उमेश सुकी यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page